मुंबई : मुंबईतील नंदनवन या निवासस्थानी शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत दक्षिण मुंबईतील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 🚩

मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आणि शिवसेना उपनेत्या सौ. आशाताई मामेडी यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या केबल सेनेचे व बॉडीबिल्डर असोसिएशनचे श्री संतान फर्नांडिस व पदाधिकारी कार्यकर्ते, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भारतीय नाविक संघटनेतील पदाधिकारी व कर्मचारी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेना सचिव सौ. मनीषा कायदे, शिवसेना प्रवक्त्या सौ. शायना एन. सी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












