रामगड पोस्ट ऑफिसच्या इंटरनेटचा खोळंबा; सरपंच शुभम मटकरांचा अधीक्षकांकडे पाठपुरावा

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : रामगड पोस्ट ऑफिस च्या सेवांमधील येणाऱ्या अडचणी संदर्भात पोस्ट ऑफिस चे जिल्हा अधीक्षक श्री एन टी कुरळपकर यांच्याशी रामगड सरपंच श्री शुभम मटकर यांनी भेट घेत चर्चा केली.
रामगड पोस्ट ऑफिस मधील बीएसएनएल लीज लाईन प्रस्ताव बरेच महिने प्रलंबित असून त्यामुळे ग्रामस्थांना पोस्ट ऑफिस च्या चकरा मारव्या लागत आहेत.
श्री कुरळपकर यांनी सदर प्रस्ताव दिल्ली ऑफिस ला प्रलंबित आहे व त्या बाबतचा पाठपुरावा चालू असल्या बाबत सांगितले तसेच बीएसएनएल व खाजगी पुरवठादार यांच्या मधे करार झाल्यास लगेच इंटरनेट पुरवणे शक्य असल्याचे सांगितले.
त्या साठी जिल्हा स्तरावरून प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.
रामगड सारख्या ग्रामीण भागात आर्थिक उलाढाली साठी पोस्ट ऑफिस अतिशय महत्वाचे असल्याने त्याचे इंटरनेट सुरळीत करण्यावर अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालावे अशी विनंती या प्रसंगी सरपंच श्री शुभम मटकर यांनी केली.