सिंधुदुर्गनगरी | १ मे २०२६
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!!
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे मंत्री मत्स्यव्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून तिरंग्याला वंदन केले आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’च्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

तसेच आजपासून भारताची १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना सुरू होत असून, पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे. १ मे ते १५ मे २०२६ पर्यंत सुरू असणाऱ्या स्व-जनगणनेत जिल्ह्यातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन यावेळी केले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पदक विजेते, क्रीडा, महिला व बालविकास आदी विभागातील मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.

सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देत, जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सर्व स्तरांवरील नागरिकांनी एकजुटीने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास आमदार निलेशजी राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा पोलीस अधिक्षक मोहन दहिकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.












