“ विधानपरिषदेच्या १० जागा, १० अर्ज — विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध!”

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका करताना सांगितले की, गोरगरीब, शोषित, दलित आणि दिव्यांगांसाठी शिवसेना नेहमीच पुढे असते. बच्चू कडू यांनी योग्य निर्णय घेतला असून ते मूळचे शिवसैनिकच आहेत, असेही त्यांनी नमूद केले. “२५ वर्षे सामाजिक संघटना चालवणे हीदेखील मोठी गोष्ट आहे. त्यांच्या येण्याने शिवसेनेची ताकद वाढेल आणि शिवसेनेमुळे बच्चू कडू यांची ताकदही अधिक बळकट होईल,” असे शिंदे म्हणाले.

दरम्यान, विधानपरिषदेच्या १० जागांसाठी प्रमुख पक्षांकडून १० अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार
सुनील कर्जतकर
माधवी नाईक
संजय भेंडे
विवेक कोल्हे
प्रमोद जठार
प्रज्ञा सातव (पोटनिवडणूक)

शिवसेना
बच्चू कडू
नीलम गोऱ्हे

राष्ट्रवादी काँग्रेस
झिशान सिद्दिकी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
अंबादास दानवे