Category बातम्या

प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक….

ब्युरो न्यूज कोकणशाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत बोलल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे. ही माहिती सूत्रांनी दिली आहे. अद्याप राज्य शासनाने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच प्रशांत कोरटकर याला महाराष्ट्रात…

‘ उमेद’ च्या माध्यमातून महाराष्ट्रात वेगळी क्रांती घडवण्याचा प्रयत्न सुरू; ना.योगेश कदम

मंडणगड : उमेद अभियान सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने बचत गटांना दिशा मिळाली. उमेदच्या माध्यमातून हळूहळू महिला व्यवसायामध्ये उतरायला लागल्या आहेत. ग्रामविकास खात्याअंतर्गत येत असलेल्या उमेद च्या माध्यमातून महाराष्ट्रात वेगळी क्रांती घडवण्याचा आपला प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन गृहराज्य मंत्री योगेश कदम…

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, महायुती सरकारचा प्रयत्न; मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे …

कणकवली, मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे, अशी घोषणा मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत केली. तलावाचा गाळ काढणे आणि तलावांवरील अतिक्रमण हटविणे यालाही प्राधान्य दिले जात आहे, असे राणे म्हणाले.प्रश्नोत्तराच्या तासावर विधान परिषदेत…

काजू बागेला आग; काजू बाग जळून बेचिराख, मोठे नुकसान

कुडाळ वेताळ बांबर्डे येथील पावणाई टेंब येथील रहिवासी मीना दिगंबर ठाकुर यांच्या घर परिसरातील काजू बागेला रविवारी दुपारी १ वा. च्या सुमारास आग लागून मोठे नुकसान झाले. ठाकुर यांच्या घरातही या आगीच्या ज्वाला घुसून कपडे जळून खाक झाले. सुदैवाने स्थानिक…

कोकणात लवकरच उभारणार ‘मालवणी भाषा भवन’….

सावंतवाडी  :  कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या भूमीने या राज्याला व देशाला दिले आहेत. त्यामुळेच पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणातील साहित्य व साहित्यिक यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. कोकणातील या…

भविष्यातील सिंधुदुर्ग आणि माध्यमांची भूमिका | साईची चावडी | अपेक्षांची पंचवीशी

kokanshahi |✍️ (साईनाथ गांवकर/ मुख्य संपादक- कोकणशाही 9405466770) सिंधुदुर्ग जिल्हा पर्यायाने कोकणच्या विकासाची संकल्पना मांडणारे सरपंच परिषद, नगरसेवक परिषद, उद्योजक मेळावे, बहुचर्चित जाबसाल, व्हिजन सिंधुदुर्ग २०३०, आरसा कोकणाचा यांसारखे एक ना अनेक उपक्रम कोकणशाहीने अगदी सुरुवातीपासूनच हाती घेतलेत. त्यातलाच एक…

राजकारण तापलं!स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात ;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा याने केली आक्षेपार्ह कविता…

ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई स्टँडअप कॉमेडियन समय रैना वादानंतर कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा याने आक्षेपार्ह कविता सादर केली. कवितेचा हा व्हिडीओ पाहून शिवसैनिकांच्या तळपायातील आग मस्तकात गेली. त्यांनी कुणाल कामराच्या सेटची…

मुंबई -गोवा महामार्गावर विचित्र अपघात ; ट्रक दरीत कोसळला….

ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई – गोवा महामार्गावर रविवारी २३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भोस्ते घाट उतरणाऱ्या बलकर ट्रेलरने ट्रक व मोटारीला दिलेल्या धडकेत आठजण जखमी झाले आहेत. गोव्याहून मुंबईच्या दिशेने रविवारी २३ रोजी सकाळी घाट उतरणाऱ्या बलकर ट्रेलरचा चालक…

९ किलो गांजा घेऊन येणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या…

रत्नागिरी रत्नागिरीत गांजा घेऊन येणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. ही कारवाई रविवार, २३ मार्च रोजी सकाळी सांगली फाट्यावर करण्यात आली. यातील संशयिता कडून ९ किलो ७८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.सत्यजित जाधव (३४, रा. विकासनगर, इचलकरंजी) असे…