
जनतेने आपल्या कारभाराला टाळे का ठोकले? याचा विचार वैभव नाईक यांनी करावा – शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी यांचे आक्रमक प्रत्युत्तर
विमानतळाला आधी विरोधाची भाषा करणारे आणि मग पेढे वाटणारे राऊत-नाईक सिंधुदुर्गला नवे नाहीत! त्यांचे मगरीचे अश्रू फक्त राणेविरोधासाठी, विकासासाठी नव्हे!! कुलूप आणि उबाठा याचे नाते अलीकडे घट्ट व्हायला लागले आहे. उद्धव ठाकरे उबाठाचे मुख्यमंत्री बनले तेव्हाही राज्याला टाळेच ठोकले गेले…








