Category बातम्या

“दिव्यज्योतीचा झळाळता निकाल! दहावीमध्ये 96.77% यशाचा डंका”

बांदा : दिव्यज्योती प्रशालेने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत 96.77% निकालाची नोंद केली आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले आहे. यामध्ये स्वरा सातार्डेकर हिने 94.20% गुण मिळवून प्रशाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला. समृद्धी परब हिने 93.40%…

SSC निकालात राणी पार्वतीदेवी हायस्कूलची दमदार कामगिरी; 99.20 टक्के निकाल

सावंतवाडी : राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज चा मार्च 2026 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचा निकात अत्यंत उज्ज्वल लागला असून विद्यालयाने 99.20 टक्के निकालाची उल्लेखनीय परंपरा कायम राखली आहे. एकूण 125 विद्यार्थ्यांपैकी 124 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून…

शक्तिपीठ महामार्गाचा नवा मार्ग जाहीर; सांगलीतील 30 गावांतून जाणार रस्ता

कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील 79 गावांतील सुमारे 2 हजार हेक्टरवरील क्षेत्रातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतील 30 गावांमधून नवीन महामार्ग प्रस्तावित आहे. या महामार्गासाठी बदललेल्या आखणीची (न्यू अलाईनमेंट) अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 6 हजार…

दहावीच्या निकालात पुन्हा कोकणचा डंका; 97.62% निकालासह राज्यात अव्वल

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीचा निकाल आज लागला आहे. यंदा 92.09 टक्के निकाल लागला. कोकण विभाग यंदाही अव्वल असून 97.62 टक्के एवढा निकाल लागला आहे. कोकण विभागाचा निकाल ९७.६२ टक्के…

सिंधुदुर्गात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; बाजारपेठा ठप्प, वाहतूक विस्कळीत

सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या तापमान वाढीमुळे उकाड्याने त्रस्त जिल्हावासीयांना अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला. गुरुवारी दुपारी ४ वा. च्या सुमारास सह्याद्री पट्टयासह अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा…

दोडामार्गात अवकाळीचा तडाखा; काजू बागायतींचे प्रचंड नुकसान, वीजपुरवठा खंडित

दोडामार्ग तालुक्यातील सोनावल, तेरवण-मेढे तसेच पाळये परिसरात आज सायंकाळी चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्याने धुमाकूळ घालत तब्बल दीड तास मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला. हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी व्यक्त केलेला अंदाज अखेर खरा ठरला असून या अचानक आलेल्या नैसर्गिक संकटाने…

SSC निकाल २०२६ आज जाहीर! एका क्लिकवर पाहा तुमची मार्कशीट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १० वीचा (SSC) निकाल आज, ८ मे २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन जाहीर होत आहे. राज्यातील १६ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार असून, अधिकृत संकेतस्थळांसह डिजीलॉकरवरही निकाल पाहता येईल. मार्कशीट…

आकाशात थरार! उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा तडाखा

एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर गुरुवारी दुपारी खराब हवामानामुळे वादळी वाऱ्यांच्या तडाख्यात सापडल्याने काही काळ मोठी खळबळ उडाली. मात्र, वैमानिकाच्या कौशल्यपूर्ण निर्णयामुळे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे जुहू विमानतळावर उतरवण्यात आले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळासह शिंद समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण…

रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर; उत्साहात पदाधिकाऱ्यांचा सत्कार

सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते भाजपा युवा मोर्चा सावंतवाडी शहर कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिलजी निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरवजी मुळीक तसेच युवा मोर्चा शहर अध्यक्ष…

भाजपच्या बळावर कोकण विकासाला गती; प्रमोद जठार यांचा आत्मविश्वास

सावंतवाडी : प्रमोद जठार यांनी आपल्या आमदारकीचा मान भाजपच्या नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना समर्पित करत पुढील सहा वर्षे कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “नेत्यांच्या आशीर्वादाने जनहितार्थ काम करत सरकारचा दुवा बनून कोकणातील उरलेला बॅकलॉग भरून काढणार,” असा विश्वास त्यांनी…