कोकणशाही

कोकणशाही

लाकडी बांबूने वृद्धावर जीवघेणा हल्ला….

लाकडी बांबूने वृद्धावर जीवघेणा हल्ला करीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेत पोबारा केला. पुरुषोत्तम नरहरी प्रभूलकर (वय ८१, रा. नापणे धनगरवाडा) असे या वृद्धाचे नाव असून रेकी हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली येथे उपचार सुरू आहेत.…

संपूर्ण राज्यात लवकरच धावणार ई-बाईक टॅक्सी….

ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई हवेतील प्रदूषण कमी करण्यासह अधिकाधिक रोजगार निर्माण करण्याचा हेतू समोर ठेवून राज्यात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परिवहन विभागाकडून त्याविषयीचा प्रस्ताव मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आणि त्यास मान्यता देण्यात आली. एक लाख…

तिहेरी अपघात ; ५ जणांचा मृत्यू, २४ जण जखमी….

ब्युरो न्यूज कोकणशाही बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. यात वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. खाजगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये…

कॅब चालकशी मैत्री करणं पडलं महागात ; महिलेची पोलिसात धाव….

मुंबई ब्युरो न्यूज कोकणशाही एका ४१ वर्षीय महिलेशी मैत्री करून वारंवार बलात्कार आणि १० लाखांची खंडणी उकळल्याच्या आरोपावरून एका ॲप-आधारित कॅब चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२३ पासून सुरू होता. त्रस्त झालेल्या महिलेने अखेर रविवारी वरळी पोलिसांकडे…

भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू ; संतप्त जमावाने ट्रक पेटवला….

रत्नागिरी : निवळी-जयगड मार्गावरील चाफे येथे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात खंडाळा येथील तरुण किरण पागदे या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने अपघात करणारा ट्रक पेटवून दिला.हा अपघात चाफे गावाजवळील निवळी-जयगड मार्गावर…

जामसंडे येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या..

देवगड जामसंडे – शांतीनगर येथील अवधूत मनोहर धुवाळी (वय २५) या युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३१ मार्च रोजी पहाटे ४.१० वा.च्या सुमारास निदर्शनास आली.अवधुत धुवाळी हा जामसंडे- शांतीनगर येथील घरी आईसोबत राहत होता,रात्री तो उशिरा आपल्या…

हवामान खात्याचा इशारा ; चक्री वादळासारखी परिस्थिती अवकाळी पावसाची शक्यता….

चैत्र महिन्याला सुरुवात होताच राज्यातील अनेक भागांमध्ये उकाड्याची वाढ झाली आहे. नागरिकांना वाढत्या उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतात सातत्याने होणाऱ्या हवामान बदलासह मुंबई…

रायगड जिल्‍ह्यातील धरणांतील पाणीसाठा चिंताजनक…

रायगड प्रतिनिधी उन्‍हाच्‍या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्‍या आहेत. त्‍याचा परीणाम धरणांतील पाणी साठ्यावर होता दिसतो आहे. पाटबंधारे विभागाच्‍या अखत्‍यारीत येणाऱ्या रायगड जिल्‍ह्यातील धरणांतील पाणीसाठा चिंताजनक आहे. २८ धरणांमध्‍ये ४३.९९ टक्‍के इतकाच पाणीसाठा असल्‍याची माहिती समोर आली आहे. या पाण्‍यावर पुढील…

जंगल परिसरात सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांची धाड …

सावंतवाडी कोलगाव – कुंभाळवाडी येथे जंगल परिसरात सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी धाड टाकत चारजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ११ हजारांच्या रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई रविवारी रात्री १०.३० वा. च्या सुमारास स्थानिक…

गोव्यातील एलईडी नौका मालवण समुद्रात पकडली ; विनापरवाना मासेमारीमुळे मत्स्य विभागाची कारवाई….

मालवण महाराष्ट्र जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर ११ सागरी मैल येथे अनधिकृतरीत्या एल.ई.डी. लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या गोवा येथील एल.ई.डी. नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई केली. नौका जप्त करून ती सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली.पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाकडून…