
वक्रतुंड संकुल, लक्ष्मीवाडी कुडाळ येथे माघी गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
श्री. राजेश हेदळकर – कुडाळ (प्रतिनिधी)
वक्रतुंड संकुल, लक्ष्मीवाडी कुडाळ येथे माघी गणेश जयंतीनिमित्त सोमवार दि. २२ जानेवारी २०२६ रोजी संकुलातील श्री गणपती मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भाविकांच्या सहभागातून हा उत्सव भक्तिभावात साजरा होणार आहे.
सकाळी ६ वाजता श्री गणपतीची नित्यपूजा होणार असून त्यानंतर सकाळी ७ ते १० या वेळेत अथर्वशीर्ष पठण, सकाळी १० ते १ या वेळेत श्री सत्यविनायक महापूजा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ०१ ते ०१.३० या वेळेत श्रींची आरती व मंत्रपुष्प, तर दुपारी ०१.३० ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ७ ते ८ या वेळेत भजनमंडळ व पाट यांचे सुमधुर भजन होणार असून रात्री ८ ते ९.३० या वेळेत संकुलातील महिला व बाल कलाकारांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम तसेच शालेय मुलांना बक्षीस वाटप. रात्री ९.३० ते ११.३० या वेळेत खेळ पैठणीचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ११.३० ते १२.०० या वेळेत आभार प्रदर्शन व बक्षीस वितरण, तर रात्री १२ ते १२.३० या वेळेत श्रींची आरती होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.











