बांदा जिल्हा परिषदेतून भाजपाचे प्रमोद कामत बिनविरोध

सावंतवाडी : बांदा जिल्हा परिषदेतून भाजपचे उमेदवार माजी सभापती प्रमोद कामत बिनविरोध ठरले आहेत. अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.