Category बातम्या

डेवगे येथे लवकरच बीएसएनएल ची 4 जी सेवा सुरु !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सावंतवाडी दि . १५- डेगवेतील बीएसएनएल मोबाईल टॉवर येत्या दोन दिवसात ४ जी सेवा सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक सर्व सामग्री एक पाठवड्यापासून गावात आणून ठेवली गेली होती. ७५ टक्के…

रॅगिंग प्रकरणी पोलिसांची कारवाई ; मुख्याध्यापकासह, रेक्टर आणि मदतनीस वर गुन्हा दाखल…

सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी एका शासकीय शाळेत रॅगिंग केल्याप्रकरणी अखेर सावंतवाडी पोलिसांनी मुख्याध्यापकासह रेक्टर व मदतनीस याच्यासह हे कृत्य करणा-या पाच अल्पवयीन विद्यार्थ्यांवर रॅगिंग प्रतिबंध आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार अत्याचार ग्रस्त विद्यार्थ्यांच्या आईने केली आहे.…

मंत्री नितेश राणे यांची वनमंत्र्यांकडे सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय उभारण्याची मागणी..

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी, मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडेसिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय उभारण्याची मागणी केलीय. वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन नितेश राणे यांनी प्राणीसंग्रहालय मागणीचे निवेदन दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा समुद्र किनारा लाभल्यामुळे…

कस्टम कडून सलग तिसऱ्या दिवशी पकडली एलइडी लाईट सह नौका,.

रत्नागिरी : प्रतिनिधी, कस्टम विभागाने सलग तिसऱ्या दिवशी दहा वाव समुद्रात गस्त घालत असताना सोमवारी सकाळी एलईडी लाईट असलेली नौका पकडली. कस्टमच्या धडक कारवाईमुळे मच्छीमारांमध्ये पर्ससीन मच्छीमारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मागील तीन दिवसापासून कस्टम विभागाने 10 वाव समुद्रात एलईडी लाईट…

मालवणात 8 व्या मजल्यावरून पडून कामगाराचा जागीच मृत्यू

मालवण शहरातील बांगीवाडा येथील इमारतीवर सेंटरींगचे काम करत असताना सेफ्टी बेल्ट निसटल्याने रोहित कुमार चौधरी (वय-२८) रा. मध्यप्रदेश हा आठव्या मजल्यावरून जमीनीवर कोसळून जागीच मृत्यू झाला. याबाबत येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बांगीवाडा येथील लीलाधर सारंग यांच्या इमारतीमध्ये…

बांगलादेशी नागरिकांना आश्रय देणाऱ्यांनाही बांगलादेशात पाठवू ; मंत्री नितेश राणे

रत्नागिरी प्रतिनिधी, बांगला देशी, रोहिंगे भारत अस्थिर करण्यासाठी आले आहेत. एकाही बांगला देशीला महाराष्ट्रात थारा दिला जाणार नाही. त्यांना कोणी आश्रय देण्याचा प्रयत्न केलाच, तर बांगला देशी नागरिकांसह आश्रय देणाऱ्यांनाही बांगला देशात पाठवून देऊ, असा इशारा बंदरे, मत्स्य व्यवसाय मंत्री…

डांबर वाहतूक करणारा टेम्पो पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही…

चालकाचा ताबा सुटल्याने डांबर वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही ,हा अपघात आडळी – कोसम घाटात घडला असून अपघातग्रस्त टेम्पो बांद्या हुन दोडामार्ग कडे डांबर वाहतूक करत होता ,या वेळी आडळी-कोसमवाडी घाटात…

ड्रोनने पकडून दिल्या अवैध मासेमारी करणाऱ्या 3 बोटी – मंत्री नितेश राणे यांचा क्रांतिकारी निर्णय

रत्नागिरीच्या समुद्रात ५ दिवसात ट्रॉलिंग, पर्सनेट बोटींवर कारवाई मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेशजी राणे यांचा क्रांतिकारी निर्णय रत्नागिरी । प्रतिनिधी सागरी सुरक्षा तसेच शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून राज्याच्या सागरी किनाऱ्यावर सुरू करण्यात…

सिंधुदुर्गात रंगणार पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धा…

सिंधुदुर्ग प्रतिनिधी, सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २९ जानेवारीला सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय पत्रकार टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे चौथे वर्ष असून जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघाने आपल्या…

चालकाच्या प्रसंगावधाना मुळे ५० प्रवाशांचा जीव वाचला !

राजापूर : प्रतिनिधी सांगलीहून राजापूरकडे येणाऱ्या येथील आगाराच्या एस्टी बसला सोमवारी अणुस्कूरा घाटात सकाळी साडेदहाच्या दरम्यान अपघात घडला. ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. एसटी चालक…