Category बातम्या

आईच्या नावाने वृक्ष, पर्यावरणासाठी दृढ निश्चय; आ. प्रमोद जठारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सावंतवाडी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने सर्वोदय नगर येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत कांचन, मोहगणी, बहावा अशा प्रकारची 15…

मडुरा स्ट्रीट लाईट दुर्घटना : जखमी युवकासाठी न्याय आणि मदतीची मागणी

सावंतवाडी : मडुरा येथील रेडकरवाडी परिसरात ३० एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मडुरा देऊळवाडी (केरकरवाडी) येथील रहिवासी सौ. सेजल सागर केरकर यांनी आपल्या पती सागर केरकर यांच्यासोबत घडलेल्या दुर्घटनेबाबत न्यायाची मागणी केली आहे.सौ. केरकर…

पावसाची खुशखबर! केरळनंतर मान्सूनची नजर आता कोकणावर

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून अखेर नैऋत्य मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत मान्सूनची वाटचाल वेगाने होण्याची शक्यता असून कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.हवामान…

जागतिक पर्यावरण दिनी मालवण-हडीत कांदळवन स्वच्छता अभियान; भेलंडा वृक्षांची लागवड

मालवण : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज दि. ५ जून रोजी विभागीय वन अधिकारी कांदळवन दक्षिण कोकण व वनपरिक्षेत्र अधिकारी, मालवण कांदळवन यांच्या विद्यमाने मालवण तालुक्यातील पाणखोल जुवा, हडी येथील राखीव कांदळवन क्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी भेलंडा (Xylocarpus…

कोकण रेल्वे गेटचा गोंधळ; तेर्सेबांबर्डेत वाहतूक व्यवस्था कोलमडली

कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वरील तेर्सेबांबर्डे बस स्टॉप ते तेर्सेबांबर्डे गावात जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे गेटला अचानक तांत्रिक बिघाडामुळे ‘लॉक’ पडल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वा. च्या सुमारास घडली. या प्रकारामुळे ऐन उन्हात वाहनचालकांना तब्बल ४५ मिनिटे खोळंबून राहावे लागले.…

कसाल ग्रामपंचायतीचा स्वच्छतेचा संकल्प; सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात श्रमदानातून परिसर स्वच्छता मोहीम कसाल ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून श्रमदाराच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या कार्यक्रमासाठी सरपंच राजन परब ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस प्राथमिक आरोग्य…

मान्सूनपूर्व पावसाचा कहर! घोटगेतील घरावर झाड कोसळले

दोडामार्ग : मान्सूनपूर्व पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घोटगे येथील नरेश नारायण काळबेकर यांच्या घरावर मोठे काजूचे झाड कोसळून घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, दोडामार्ग तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावत अनेक ठिकाणी पडझडीच्या…

शिवरायांच्या चरणी पहिला कोटी! आमदार प्रमोद जठारांचा राजकोट किल्ल्यासाठी मोठा निर्णय

भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असलेले प्रेम कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आ. जठार यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अद्वितीय आहे. येथे…

सिंधुदुर्गच्या पाणीप्रश्नांवर पालकमंत्री नितेश राणेंचा थेट हस्तक्षेप; मंत्रालयातून कडक निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जल जीवन मिशनची कामे, प्रलंबित योजना आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेऊन प्रशासनाला स्पष्ट आणि कडक निर्देश दिले. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत व सुरक्षित पाणीपुरवठा मिळावा, यासाठी…

वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रशासन अलर्ट; पालकमंत्र्यांची अधिकाऱ्यांना ताकीद

मुंबई : सिंधुदुर्ग मंडळांतर्गत विद्युत उपकरणांची देखभाल, दुरुस्ती तसेच विविध प्रलंबित अडचणींच्या अनुषंगाने आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी आवश्यक सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.बैठकीत दुरुस्ती…