कोकणशाही

कोकणशाही

२८ वर्षीय युवतीचा विनयभंग ; आरोपीला अटक

खेड शहरातील एका २८ वर्षीय युवतीचा विनयभंग करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तालुक्यातील चिंचघर-प्रभूवाडी येथील प्रतिक संजय शिंदे (२४) याला पोलिसांनी अटक केली. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी…

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक ; तारापोरवाला मत्स्यालयाला आधुनिक स्वरूप मिळणार

मुंबई – तारापोरवाला येथे सर्वात जुने मत्स्यालय असून पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे तारापोरवाला मत्स्यालय विकासास तत्त्वतः मान्यता देत आहे. या उपक्रमाद्वारे मत्स्यालयाला आधुनिक स्वरूप देण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.…

शिमगोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज !

कणकवलीः होळी रे होळी… पुरणाची पोळी, आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना… आकाशातून पडली किशी आणि…..ची जळली मिशी अशा आरोळ्या, हाकारे देत गुरुवार 13 मार्चपासून सिंधुदुर्गात शिमगोत्सवास प्रारंभ होत आहे. सकाळी होळी निमित्त पुरणपोळ्या आणि शेवया असा गोडधोड पदार्थांचा बेत तर सायंकाळच्या…

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते…

सावंतवाडी, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्वागत समिती अध्यक्ष म्हणून आमदार तथा सिंधुरत्न समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर तर संमेलन अध्यक्ष वस्त्रंकार गंगाराम गव्हाणकर हे…

माटणे येथे मातीसाठ्यावर महसूलची दंडात्मक कारवाई केली.

दोडामार्ग, माटणे येथे पत्रकारांना वृत्तांकन करण्यापासून रोखणाऱ्या बाप-लेकाला महसूलने चांगलाच दणका दिला आहे. तब्बल ८१ ब्रास माती साठा जप्त करून संबंधित जमीन मालक रामचंद्र विनायक तेली यांना २ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबतची नोटीस मिळाल्यापासून सात…

मालवण, पालघरच्या समुद्रात सापडले खनिज तेलसाठे….

सिंधुदुर्ग :  मालवण येथील खोल समुद्रात सुमारे १९ हजार १३१. ७२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर नवीन खनिज तेलसाठे सापडले आहेत. नव्याने झालेल्या संशोधनात मालवणबरोबरच पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेतही तेलसाठे सापडले आहे. संबंधित क्षेत्रात केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार…

आईने दोन्ही मुलांना ८० फूट खोल विहिरीत टाकले नंतर स्वतः उडी घेऊन केली आत्महत्या…

सोलापूर येथे मुलीच्या जन्मानंतर झालेली दोन्ही मुले गतिमंदच असल्याच्या चिंतेतून आईने त्या दोन्ही मुलांना गावाजवळील ८० फूट खोल विहिरीत टाकले. नंतर स्वतः उडी घेऊन आत्महत्या केली. वांगी (ता. उत्तर सोलापूर) येथे ही दुर्घटना घडली. चित्रा कविराज हाके, स्वराज हाके यांचे…

ज्येष्ठ नागरिक आणि जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने स्वतंत्र वेबसाईट …

ओरोस ज्येष्ठ नागरिक आणि जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली असून पर्यटकांना जिल्ह्यातील पर्यटन ठिकाणे व आवश्यक पोलिस स्टेशनची माहिती उपलब्ध व्हावी या दृष्टीने या वेबसाईटचा उपयोग होणार आहे. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी कायद्यांतर्गत मार्गदर्शक ठरणारी माहिती तयार…

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार दिवस सुरू असलेले काम बंद आंदोलन अखेर मागे…

सावंतवाडी नगरपालिका परिसरात कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न नक्कीच सोडवले जातील, असे आश्वासन सावंतवाडीचे प्रभारी मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांनी दिल्यानंतर गेले चार दिवस सुरू असलेले काम बंद आंदोलन अखेर बुधवारी कर्मचाऱ्यांनी मागे घेतले. यावेळी किमान वेतन वाढ, ईपीएफ,…

एल.ई.डी. लाईट वापरणाऱ्या नौकेवर कारवाई…

रत्नागिरी : समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्यानंतर रत्नागिरीचे मत्स्य व्यवसाय खाते ऐक्शन मोड वर आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दापोली तालुक्यातील लाडघर- र-बुरोंडी समुद्रामध्ये सोमवारी मध्यरात्री एल.ई.डी. लाईट वापरणाऱ्या…