कोकणशाही

कोकणशाही

आंबोली घाटात सुरक्षा वाढवण्यासाठी सरपंच सागर ढोकरे आक्रमक

सावंतवाडी : मद्यधुंद अवस्थेत आंबोली घाटातून येणाऱ्या वाहन चालकांकडून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघातात एका चिमुकलीचे निधन झाले असून घाटातून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करून नंतरच त्यांना पुढे जाऊ द्यावे, अशी मागणी गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी…

“शक्तिपीठ महामार्गावरून राजकीय खळबळ; केसरकरांनी मांडला सिंधुदुर्गाचा मुद्दा”

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचा नवीन आराखडा हा कोकणासह विशेषतः सिंधुदुर्गावर अन्याय करणारा आहे. हा महामार्ग थेट गोव्याला जोडताना त्याचा एक फाटा रेडी बंदराला जोडला जावा अशी आपली मागणी असून याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे अशी माहिती…

वेंगुर्लेकरांसाठी नवीन आकर्षण – ‘नमो उद्यान’चे मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

वेंगुर्ले शहरातील खांबडभटवाडी येथे पहिले “नमो उद्यान” विकसित होत आहे. या उद्यानाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. निवडणूक प्रचाराच्या वेळी या भागाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या भूमिपूजन कार्यक्रमाला नगराध्यक्ष दिलीप…

शिल्पकार श्री. दत्तात्रय मठकर यांना प्रतिष्ठेचा ‘भारतरत्न गौरव’ पुरस्कार जाहीर

दत्तात्रय मठकर यांना पुरस्कार जाहीरवेंगुर्ला : मुंबई मराठी युवा पत्रकार संघ आदर्श मुंबई फाउंडेशन आणि ओंकार अकॅडमी ऑफ आर्टस यांच्यावतीने आयोजित‘संविधान सन्मान परिषद २०२६’ चा भारतरत्न गौरव पुरस्कार वेंगुर्ला-हरिचरणगिरी येथील शिल्पकार दत्तात्रया मठकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा…

सावंतवाडीत भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांच्या समवेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा दिमाखदार शुभारंभ

भाजपा महाराष्ट्र युवा नेते मा विशालजी परब यांच्या समवेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोदजी कामत, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो भीमसैनिकांसोबत अभिवादन कार्यक्रम संपन्न आज सावंतवाडी शहरात समाज मंदिरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेला…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा कणकवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन !

कणकवली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली बसस्थानक शेजारील बुद्धविहाराला भेट देत पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित आंबेडकरी अनुयायांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. बुद्धविहार परिसरात उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा व त्यांचे विचार…

“१३५ वी जयंती उत्साहात साजरी: पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयात अभिमानाचा क्षण

आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी आपल्या पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयामध्ये विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली. दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे सचिव डॉ. अरुण गोडकर साहेब यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्ज प्रतिमेला पुष्पहार अर्पण…

सावंतवाडीत आंबेडकर जयंतीचा प्रेरणादायी उत्सव; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी – राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेच पूजन करून अभिवादन करण्यात आले. यंदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे सल्लागार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मंडळाचे…

शिरोडा येथे भव्य सकल हिंदू संमेलनाचे आयोजन

शिरोडा : सनातन हिंदू धर्म, परंपरा आणि संस्कृतीचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने शिरोडा येथे भव्य ‘सकल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन गुरुवार, दि. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान,…

श्री. आकाश तांबे यांचे मार्गदर्शन: डॉ. आंबेडकरांचे विचार आजही तितकेच प्रभावी

वाडा हायस्कूलमध्ये डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी (वाडा) येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कूल येथे मंगळवार दि.१४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती प्रशालेच्या तात्या भिडे सभागृहात सकाळी ८.१५ वाजता साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी प्रशालेचे सहा.शिक्षक…