कोकणशाही

कोकणशाही

🌊 तिलारी धरणातून उद्यापासून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

दोडामार्ग : तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे २४ जुलै २०२६ पासून नियमानुसार अतिरिक्त पाणी तिलारी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे व…

⚡ सावडाव धबधब्यावर तुफान राडा! कर्मचाऱ्यांना मारहाण, ग्रामस्थांवर दगडफेक, एक पर्यटक ताब्यात

कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा येथे पर्यटन कराच्या मुद्द्यावरून दाजीपूर आणि इचलकरंजी येथून आलेल्या पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठा वाद झाला. ही घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. सावडाव ग्रामपंचायतीकडून धबधब्याकडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे दहा रुपये पर्यटन कर घेतला…

😟 देवगडकरांना मोठा धक्का! देवगड-बोरिवली बसफेरी अचानक बंद

देवगड : देवगड-बोरिवली ही नियमित बसफेरी गेल्या काही दिवसांपासून अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होतेय. कमी भारमानामुळे ही बस सद्यस्थितीत बंद केल्याची माहिती आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर यांनी दिली असून ऑगस्टमध्ये ही ती पूर्ववत सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.…

देवगडचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. तन्मय आठवले यांची महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या सहायक वेबमास्टरपदी निवड

देवगड : राज्यस्तरीय पदावर निवड झालेले महाराष्ट्रातील सर्वात तरुण अस्थिरोगतज्ज्ञ; देवगडच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानास्पद कामगिरी.देवगड मेडिकल फाउंडेशनचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. तन्मय सुनील आठवले यांची प्रतिष्ठित महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या सहायक वेबमास्टरपदी तसेच कार्यकारी समिती सदस्यपदी निवड झाली आहे. अत्यंत कमी वयात महाराष्ट्रातील…

महिला व्यावसायिकांसाठी रोजगार व शासकीय योजनांवर मार्गदर्शन शिबिर; २३ जुलै रोजी कणकवलीत आयोजन

संजय पेटकर | कणकवली कणकवली तालुका व्यापारी संघाशी संलग्न महिला व्यावसायिक संघटना, कणकवलीची नुकतीच स्थापना करण्यात आली असून, महिला उद्योजिका आणि व्यावसायिकांना व्यवसायात अधिक सक्षमपणे कार्य करता यावे तसेच आधुनिक व्यावसायिक आव्हाने, संधी आणि शासकीय योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने…

सुकळवाड येथील एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षमित्र लेखक श्री. प्रकाश काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयात सन 2015 साली महाविद्यालयाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये नक्षत्रवनप्रमाणे वृक्षारोपण करण्यात आले. “एक झाड देशासाठी” या उद्देशाने निसर्गरम्य वातावरणामध्ये महाविद्यालयात 268 हून अधिक नक्षत्र वनामध्ये झाडे लावण्यात आली. सुंदर पर्यावरण…

🌧️ मुंबईकरांना मोठा दिलासा! अवघ्या दोन दिवसांच्या पावसाने तलावसाठ्यात विक्रमी वाढ

मुंबई : तलावाच्या पाणलोट क्षेत्रात दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात होणारी घट थांबली असून आता पुन्हा पाणीसाठा वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसात ४७ हजार ४७९ दशलक्ष लिटर पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीसाठा ५४ टक्केच्या वर…

📢 दाभोळे बौद्धवाडीत स्मशानभूमीची बिकट अवस्था; मनसेने दिला आंदोलनाचा इशारा

देवगड : देवगड तालुक्यातील दाभोळे गावातील बौद्धवाडी स्मशानभूमीची दूरावस्था कायम असून गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही आवश्यक सुविधा उपलब्ध झालेल्या नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवगड तालुकाध्यक्ष संतोष गोपाळ मयेकर यांनी केला आहे. प्रशासनाने १५ ऑगस्टपूर्वी स्मशानभूमीतील मूलभूत समस्या…

🐄 रस्त्यावर गुरांचे साम्राज्य! सातार्ड्यात जीव धोक्यात, प्रशासनाचे लक्ष कधी?

सावंतवाडी : सातार्डा पंचक्रोशीत मोकाट गुरांचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मोकाट गुरांची समस्या सोडविण्यासाठी प्रभारी प्रांताधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील यांचे लक्ष वेधणार असल्याचे जि. प. सदस्य सुदन कवठणकर यांनी सांगितले. परिसरातील शेतकरी गुरे मोकाट…

🏆 ‘तुमच्या यशाचा महाराष्ट्राला अभिमान!’ – पी. व्ही. सिंधूला मंत्री नितेश राणेंच्या शुभेच्छा

मुंबई : भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी कामगिरी करत पी. व्ही. सिंधू यांनी जपान ओपन २०२६ स्पर्धेचे विजेतेपद पटकावत नवा इतिहास रचला आहे. जपान ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय खेळाडू ठरल्या आहेत.अथक परिश्रम, जिद्द आणि अविरत मेहनतीच्या…