कोकणशाही

कोकणशाही

‘स्त्रीवाद’ समजून घ्या; तो पुरुषविरोध नाही! – कवयित्री सरिता पवार

अनुभव शिक्षक केंद्र व गोपुरी आश्रमाच्या वतीने युवाईसाठी वक्तृत्व स्पर्धा संपन्न संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोध असा काहीसा विचार समाजमनावर पसरलेला दिसतो परंतु स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोध नसून स्त्रीवाद म्हणजे ‘मानवतावाद’ आहे. हा विचार युवक…

बेपत्ता खलाशाचा मृतदेह सापडताच देवगड बंदर परिसरात खळबळ!

देवगड : देवगड बंदरातील ‘एकदंत’ या नौकेवरून बेपत्ता झालेला खलाशी वासुदेव गणपत कांबळे (५८, मूळ रा. डोर्ले, गावखडी रत्नागिरी, सध्या रा. देवगड बंदर) याचा मृतदेह बंदर परिसरातील खाडीच्या पाण्यात आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी…

देवगड-वाड्यात महापुरुषांच्या बॅनरची विटंबना; परिसरात तणाव!

देवगड : देवगड तालुक्यातील वाडा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे लावण्यात आलेले महापुरुषांच्या अभिवादनाचे बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे तेथील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सदर घटनेचा निषेध व्यक्त करीत बौद्ध समाजाच्या भावना…

दर्याने भरली मच्छीमारांची जाळी; कोळंबीच्या आवकेने बाजार गजबजला!

वेंगुर्ले : १५ ऑगस्टनंतर अधिकृत सागरी मच्छीमारी सुरुवात झाल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच स्थानिक मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात कोळंबी मिळाल्याने मच्छीमार सुखावला आहे. गेले काही दिवस फक्त बांगडा मासा व इतर बारीक मासे कमी प्रमाणात मिळत असल्याने मच्छीमार नाराज होता; मात्र रविवारी लहान…

महाराष्ट्र राज्य काजू मंडळ गठित विशेष समिति सभा संपन्न

सिंधुदुर्ग : कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाच्या अडचणी, काजू उद्योगाला लागणारे खेळते भांडवल, दर्जेदार कच्चा मालाचा अनियमित पुरवठा इत्यादी समस्यांबाबत काजूमंडळाने एक सर्व समावेशक योजना (comprehensive scheme) तयार करणे करता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे माननीय संचालक श्री मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली…

रिझर्व बँक ऑफ इंडिया संचालक सतीश मराठे यांची कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाला सदिच्छा भेट

राजेश हेदळकर / कुडाळ : रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी आज कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष अरविंद शिरसाट व संचालक निलेश तेंडुलकर यांनी त्यांना शाल, पुष्पगुच्छ व श्री गणेशाची प्रतिमा…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कर्मचारी व कुटुंबीय स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

📌रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांचे मार्गदर्शन , 📌पाच वर्षांच्या कामकाज आढावा पुस्तिकेचे प्रकाशन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचारी व कुटुंबीयांचा स्नेह मेळावा आज शरद भवन, ओरोस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया…

सिंधुदुर्गची ‘शार्प शूटर’ रूपाली! राष्ट्रीय थलसेना फायरिंग स्पर्धेसाठी निवड

मालवण : मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागातील सीनियर अंडरऑफिसर रूपाली करंगुटकर हिने राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश संपादन केले आहे. दिल्ली येथे ३१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प…

गणेशोत्सवाची वर्दळ वाढणार, पण रस्त्यावर झाडीचा विळखा; प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी!

सावंतवाडी : आरोंदा-मळेवाड तसेच मळेवाड-शिरोडा मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडी-झुडपे गणेश चतुर्थीपूर्वी तोडण्यात यावीत तोडण्याची मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.आरोंदा-मळेवाड तसेच मळेवाड-शिरोडा मार्गाच्या दुतर्फा वाढलेली ही झाडी सध्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून, अपघातास निमंत्रण ठरत आहे. गणेश चतुर्थीचा…

गणेशोत्सवापूर्वी गांगोवाडीला प्रकाशाची भेट; सौर हायमास्टचा शुभारंभ!

गांगोवाडी, कणकवली सौर ऊर्जेचा हायमास्ट कार्यान्वित. संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : सुमारे वर्षभरापूर्वी जिल्हा नियोजन समिती मधून महाराष्ट्र नगरोत्थान(शहर विकास)महाअभियान कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या सौर ऊर्जेच्या हायमास्टचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. माजी नगरसेवक शिशीर परूळेकर व विद्यमान नगरसेविका सौ.…