कोकणशाही

कोकणशाही

सिंधुदुर्गात इंधन टंचाई? अफवांना बळी पडू नका – प्रशासनाचा इशारा!

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे आगमन होत असल्याने काही काळ इंधन पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेत BPCL, HPCL आणि IOCL या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी तसेच जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांशी समन्वय साधून पुरवठा…

स्व-गणना अभियान: शंभर टक्के यशासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सुरू असलेल्या स्व-गणना मोहिमेला गती देत ती शंभर टक्के पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. १ मे २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी निवासी…

चार महिन्यांच्या अडथळ्यानंतर शिक्षकांच्या पगाराला हिरवा कंदील । Kokanshahi ।

मुंबई : संच मान्यता शालार्थ ला जोडल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालयांची पदे मिस मॅच होत होती. या कारणास्तव गेले चार ते पाच महिने संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाना वेतन करताना असंख्य अडचणी येत होत्या.पगार बिल फॉरवर्ड केल्यावर ते वेतन अधीक्षक लॉगिन ला न…

आंबा–काजू बागायतदारांसाठी दिलासा; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश!

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात यंदा कडाक्याची थंडी आणि अवेळी पडलेल्या पावसामुळे आंबा व काजू या प्रमुख फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी…

नेमळे विहिरीत सापांचा थरार! एकाच ठिकाणी सापडले तब्बल ४२ पाणघोणस

सावंतवाडी : नेमळे फौजदारवाडी येथे विहिरीचे काम सुरू असताना सापांचा मोठा घोळका सापडल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, येथील सर्पमित्र ओंकार गावडे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता चक्क ४२ ‘पाणघोणस’ जातीच्या सापांना सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांना जीवदान दिले. त्यांच्या या…

कणकवलीत काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

कणकवली येथे लग्न सोहळ्यासाठी दुचाकीवरून येत असताना सांगवे पामतेल येथे एका अज्ञात वाहनाने दुचाकीलाजोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले बाळकृष्ण आत्माराम सावंत (७५, रा. भिरवंडे) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री ८.२० वाजण्याच्या सुमारास घडला. शुभम…

आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत रंगला बैलगाडा शर्यतीचा जल्लोष

मालवण तालुक्यातील मालोंड माळ येथे पारंपरिक आणि थरारक अशा राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत- २०२६ या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. राकेश परब मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळाला. या शर्यतीला विशेष आकर्षण लाभले ते म्हणजे आमदार…

माजगावात भर वस्तीत फणसाच्या झाडाला भीषण आग; अग्निशमन दलाने टळवला अनर्थ!

सावंतवाडी तालुक्यातील माजगाव वरचीआळी परिसरात भर वस्तीत असलेल्या एका फणसाच्या झाडाला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्यामुळे आग विझवण्यात यश आले आणि मोठा धोका टळला.माजगाव वरची आळी परिसरात जमिनीवर साठलेल्या पाला-पाचोळ्याला अचानक आग लागली…

“‘आधी चोरी, मग आरडाओरडा’ – मालवण मच्छिमारांचा रत्नागिरीवर निशाणा”

मालवण : सिंधुदुर्गच्या समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या रत्नागिरीच्या पर्ससीन नौकांना सिंधुदुर्गातील काही नौका घेरून नौकांवरील मासळी लुटतात व खलाशांना मारहाण करतात असा गंभीर आरोप रत्नागिरी येथील पर्ससीन नेट मच्छिमार संघटनांनी केला आहे. यावर मालवण मधील दांडी येथील श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी…

सिंधुदुर्गनगरीत दर शनिवारी ‘अस्सल गाठवठी आठवडा बाजार’चा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी : ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी आणि ग्राहकांना ताजा शेतमाल मिळावा या उद्देशाने सिंधुदुर्गनगरी पंचक्रोशी मधील लोकांच्या सोईसाठी दर शनिवारी ‘अस्सल गाठवठी आठवडा बाजार’ भरविण्यात येणार आहे. शनिवार दिनांक ९ मे रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…