कोकणशाही

कोकणशाही

परदेशात अडकलेले मराठी कामगार सुरक्षित भारतात; खा. नारायण राणेंची तत्पर कारवाई ठरली निर्णायक

कणकवली : इराण – अमेरिका इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार,भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सुखरूप भारतात घरी आणण्यात आले आहे. या बोटीवर मालवण तालुक्यातील दांडी येथील प्रतीक…

मठकरवाडीतील भीषण अपघातात देवगडच्या तरुणाचा दुर्दैवी अंत

वेंगुर्ला : वेंगुर्ले-सावंतवाडी मुख्य मार्गावर मठकरवाडी येथील भीषण अपघातात एका २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम संतोष गुरव (वय २४, रा. पोंभुर्ले, देवगड) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, ज्यामुळे रस्ता ओला…

कोकण किनारपट्टीवर संकटाचे ढग! यंदा 24 दिवस समुद्र ‘उधाण’

4.5 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार, 145 गावांना सतर्कतेचा इशारा रायगडातील 145 गावांना यावर्षी पुराचा धोका उद्भवणार आहे. पावसाळ्यात २४ दिवस मोठे उधाण येणार असून तब्बल साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. याच काळात मुसळधार पाऊस कोसळल्यास किनारपट्टीवरील गावांमध्ये पाणी घुसून…

रस्ते-उद्यान प्रकल्प लवकर पूर्ण करा – आमदार निलेश राणेंचे निर्देश

कुडाळ नगरपंचायतीच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी प्रशासन व नगरसेवकांची बैठक घेतली यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी विनायक औंधकर, नगरसेवक विलास कुडाळकर, अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, निलेश परब, उदय मांजरेकर, गणेश भोगटे, नगरसेविका नयना…

कांदळगावात शॉर्टसर्किटची ठिणगी, १६ एकर बागायतीला भस्मसात

मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे चंद्रशेखर आत्माराम परब यांच्या मालकीच्या सुमारे १६ एकर बागायती क्षेत्रात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत आंबा व काजू बागायतीसह इतर झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची…

सावंतवाडीत २१ ठिकाणी नुकसान, दीपक केसरकरांची तातडीची पाहणी

सावंतवाडी शहरात रात्री वादळी वाऱ्याने थैमान घालत मोठे नुकसान केले. यानंतर माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी घटनास्थळी जात नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. शहरात तब्बल २१ ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत तहसीलदार यांना ताबडतोब पंचनामा करायला सांगून चक्रीवादळाच्या…

साई मंदिर वर्धापन दिनी रक्तदानाची अनोखी भेट; मसुरेत २४ जणांचे योगदान

मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ मसुरे गढघेरा बाजारपेठ आणि रक्त केंद्र व रक्त विघटन केंद्र सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने साई मंदिर मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी २४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.मसुरे साई मंदिर येथील साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त साईकृपा…

सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी । Kokanshahi ।

सिंधुदुर्ग राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असतानाच सायंकाळी आंबोली परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. तब्बल एक तास चाललेल्या या पावसामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला असून आंबा, काजू आणि…

🚨 रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उघड! RPF ची धडक कारवाई

कणकवली : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करताना आढळल्या प्रकरणी मारुती दशरथ ठाकूर (वय ५५, रा. नेरूर, कुडाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रत्नागिरी रेल्वे सुरक्षा बलाची (आरपीएफ) अपराध शाखा व कणकवली रेल्वे सुरक्षा बल यांनी एकत्रितरित्या मंगळवारी सकाळी…

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत इंधन साठा व वितरणावर भर ; नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासन सतर्क

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात IOCL, BPCL व HPCL या तेल कंपन्यांच्या गॅस तसेच पेट्रोल/डिझेल विभागाच्या सेल्स अधिकाऱ्यांसह MNGL कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यातील इंधन व गॅस पुरवठ्याची स्थिती सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने ही बैठक…