गणेशोत्सवाच्या तयारीला वेग! कुडाळमध्ये गणेश मूर्तिकार एकत्र येणार

सावंतवाडी : गणेश मूर्तिकार संघ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित गणेश मूर्तिकारांचा मेळावा १० जूनला सकाळी १० वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नवीन सभासदांना ओळखपत्र देण्यात येतील. त्यासाठी सोबत आधारकार्ड, झेरॉक्स व स्वतःचे फोटो आणावेत. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे पूजन करण्याबाबत अहवालपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. सर्व मूर्तिकारांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.