सिंधुदुर्गच्या विकासकामांवर पालकमंत्री नितेश राणेंची कडक नजर; प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पत्तन विभागाच्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित मंत्रालयातील दालनात घेण्यात आला. दिनांक ३ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार संबंधित विभागांकडून सद्यस्थितीतील कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील नियोजित विकासकामांपैकी पूर्ण झालेल्या कामांची माहिती घेऊन प्रलंबित कामांच्या प्रगतीचा सखोल आढावा घेण्यात आला. तसेच प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.


पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अपूर्ण व रखडलेल्या कामांचे वर्गीकरण करून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. निधीअभावी, परवानगीअभावी अथवा इतर प्रशासकीय कारणांमुळे रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारून ती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जागेचा प्रश्न, परवानग्या किंवा स्थानिक अडचणींमुळे प्रलंबित असलेल्या कामांबाबत संबंधित नागरिक व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून सकारात्मक तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, दिनेश बागुल अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, पूजा इंगावले vc द्वारे उपस्थित होते.