सिंधुदुर्गला ‘आरोग्यसंपन्न जिल्हा’ बनवण्याचा निर्धार; पालकमंत्री नितेश राणेंच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय जिल्हा आरोग्य संपन्न गाव अभियान समितीची मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित मंत्रालयात बैठक पार पडली. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य अभियानांचा बैठकीत आढावा घेत पालकमंत्र्यांनी संबंधित अभियानांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत नोंदणी करून सक्रिय सहभाग नोंदवावा, अशा सूचना दिल्या

तसेच, विविध अभियानांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे का, याची सविस्तर पडताळणी करण्याचे निर्देश दिले. विविध स्तरांवरील कर्मचारी संख्या, त्यांची उपलब्धता आणि गरजेनुसार नियोजन याबाबतही संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रवींद्र खेबुडकर,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग, जिल्हा कार्यक्रम अधिकारी: महिला व बालविकास सिंधुदुर्ग, जलजीवन मिशन प्रकल्प संचालक :सिंधुदुर्ग, जिल्हा शल्यचिकित्सक यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.