इन्सुली : सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले भाजप युवा नेते विशाल परब यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती दिली आहे. इन्सुली पागावाडी येथील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या वृद्ध विधवा माता आणि तिच्या गंभीर आजारी मुलाच्या मदतीसाठी विशाल परब यांनी तातडीने पुढाकार घेत माणुसकीचा आदर्श घालून दिला.
इन्सुली पागावाडी येथील जनाबाई धोंडू पाटील (वय ६५) या वृद्ध महिला मोडकळीस आलेल्या घरात आपल्या मुलासह राहत आहेत. घराचे छप्पर
उडालेले, भिंतींना मोठ्या भेगा गेलेल्या आणि घराचा काही भाग कोसळलेला असल्याने आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासमोर मोठे
संकट उभे ठाकले होते. त्यातच त्यांचा मुलगा शाहू पाटील हा गंभीर क्षयरोगाने ग्रस्त असल्याने या कुटुंबाची परिस्थिती अधिकच बिकट झाली
या कुटुंबाची दयनीय अवस्था जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने ही बाब भाजप युवा नेते विशाल परब यांच्या कानावर घातली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत विशाल परब यांनी कोणतीही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला.
यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “समाजातील गरजू, वंचित आणि संकटात सापडलेल्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. पावसाळ्याच्या तोंडावर एका वृद्ध मातेला आणि आजारी मुलाला असुरक्षित अवस्थेत सोडणे योग्य नाही. या कुटुंबाला सुरक्षित निवारा आणि आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
विशाल परब यांनी दिलेल्या तात्काळ मदतीमुळे जनाबाई पाटील यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि मानवतावादी भूमिकेचे परिसरातून स्वागत होत असून, अनेक नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याची परंपरा जपत विशाल परब यांनी पुन्हा एकदा समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कृतीमुळे एका हतबल माऊलीच्या डोळ्यात आशेचा किरण निर्माण झाला असून, “गरिबांचा खरा आधार” अशी भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.











