कणकवलीत वाहतूक कोंडीवर लगाम; बेशिस्त पार्किंगविरोधात कठोर निर्णय लवकरच

कणकवली : शहरातील वाहतूक कोंडी दूर करून शिस्त आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्वच्छ सुंदर कणकवली करतानाच बेशिस्त पद्धतीने होणारी वाहतूक कोंडी व पार्किंग याबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. अतिक्रमण हटविण्यासोबतच त्यासाठीच्या काही पर्यायांवर आमचाविचार सुरू आहे. लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले.
उड्डाणपुलाखालील जागेच्या सुशोभीकरणाच्या अनुषंगाने निविदा काढण्यात आली आहे. नरडवे चौक ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंतचा भाग सुरुवातीला सुशोभित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटनेनेही पारकर यांची भेट घेऊन चर्चा केली होती. पटवर्धन चौकापासून सुशोभिकरणास सुरूवात