कसालच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पुन्हा सिद्ध; शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश

कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज कसाल येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इयत्ता 5 वी व 8 वीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत पात्रता प्राप्त केली.
इयत्ता 5 वी मधून एकूण 5 विद्यार्थी पात्र ठरले. त्यामध्ये कीर्ती विनोद खंडागळे हिने 196 गुण मिळवत विशेष यश संपादन केले. तसेच सोहम बंडोपंत हुर्दुके याने 162 गुण, स्वरा संतोष लोकेरे हिने 146 गुण, युवराज सुनील आचरेकर याने 142 गुण तर साईनाथ प्रविण जाधव याने 134 गुण मिळविले.
इयत्ता 8 वी मधून 4 विद्यार्थी पात्र ठरले असून जगनाथ सदानंद परब याने 182 गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच दिव्य रामचंद्र वनकर याने 176 गुण, पियुष भिकाजी पारकर याने 164 गुण आणि तारक महेश बांदेकर याने 142 गुण प्राप्त केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष अवधूत मालणकर, संस्था सचिव आशिष परब तसेच मुख्याध्यापक उत्तम मळगावकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षकवर्ग व पालकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.