सिंधुदुर्गातील बुद्धिबळपटूंना राज्य स्पर्धेचे दार खुले

सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल आयोजित व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना संलग्नित सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन २३ व २४ मे ला शिवाजीनगर, कणकवली येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत ७ ९, ११, १३, १५ व १७ वर्षाखालील खुली व मुली गटांचा समावेश आहे.
प्रत्येक गटातून पहिल्या दोन स्पर्धकांना राज्य निवड स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असून त्यांना प्रवेश फी सवलत व मोफत निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. ७ वर्षाखालील गटाची राज्य स्पर्धा पुणे येथे, ९ वर्षाखालील गटाची संभाजीनगर येथे तर १३ वर्षाखालील गटाची स्पर्धा सोलापूर येथे होणार आहे.
स्पर्धा फिडे नियमांनुसार खेळविण्यात येणार असून प्रत्येक फेरी २० मिनिटांची राहील. सहभागी खेळाडू आपल्या वयोगटानुसार एकापेक्षा अधिक गटातही सहभागी होऊ शकतील. स्पर्धा पंच म्हणून श्रीकृष्ण आडेलकर कार्य पाहणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष सुयोग धामापूरकर, उपाध्यक्ष सुशील निब्रे, सचिव श्रीकृष्ण आडेलकर तसेच सदस्य नंदन वेंगुर्लेकर, प्रदीप जोशी, मिलिंद केळुसकर व शिवाजी शारबिद्रे यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.