कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना बळकट करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणे आपणही कायम सोबत असल्याचे श्रीमती पवार यांनी सांगितले. अबिद नाईक यांच्या पत्नी हुमेरा नाईक, मुलगी रिजा नाईक, आक्सा शिरगावकर उपस्थित होत्या.












