श्री देव आदिनारायण विकास सेवा सोसायटी परुळे आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक परुळे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी व 12वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
10वी बोर्ड परीक्षा
कुडाळ तालुक्यातून प्रथमः कु. दिया निलेश सामंत
परुळे हायस्कूलः
- प्रथमः कु. अवंतिका अमेय देसाई
- द्वितीयः कु. विशाखा प्रभू पंचलिंग
- तृतीयः कु. श्रुती मधुकर राणे
12वी बोर्ड परीक्षा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमः कु. गायत्री विवेकानंद बागलकर
पाट हायस्कूल - प्रथमः कु. अर्पिता अमेय सामंत
- द्वितीयः कु. दिक्षा परब
- तृतीयः कु. शाल्मली शंकर घोगळे
परुळे हायस्कूलचा यंदाचा 10वीचा निकाल 100% लागत्याबद्दल शाळेचाही विशेष सत्कार करण्यात आला. सर्व गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सोसायटीचे चेअरमन निलेश सामंत, व्हा. चेअरमन प्रसाद पाटकर, शाळा व्यवस्थापन संस्थेचे अमेय देसाई, बैंक अधिकारी हंजनकर, संचालक प्रकाश चव्हाण, शंकर राठीवडेकर, विठोबा राणे, महादेव साफळे, रामकृष्ण मेस्त्री, संतोष परुळेकर, सहदेव कदम, सुवर्णा सावंत, सचिव चंद्रकांत सावंत, कर्मचारी रूपा करलकर आदी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल सोसायटीच्या सर्व पालक वर्गातून आभार व समाधान व्यक्त करण्यात आले.












