मुंबईच्या गेटवे परिसरातील इंधनावर चालणाऱ्या बोटींच्या रूपांतरणासंदर्भात गेटवे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत एक बैठक झाली, ज्यामध्ये सविस्तर चर्चा झाली.
इंधनाची बचत, हरित पर्यावरण आणि प्रदूषणमुक्त मुंबई या दृष्टिकोनातून, सध्या डिझेलवर चालणाऱ्या बोटींचे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे आणि मी या संदर्भात पूर्ण सहकार्य करीन. या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य आणि अनुदान उपलब्ध व्हावे यासाठी मुंबई बँकेसोबत चर्चा सुरू आहे आणि बोटींसाठी विशेष योजना सुरू करण्याबाबत सकारात्मक संवाद सुरू असल्याचे मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी आश्वासन दिले.
बोट मालकांनी यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचा पुढाकार घ्यावा आणि गेटवे असोसिएशननेही या प्रकल्पाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.












