“दिव्यज्योतीचा झळाळता निकाल! दहावीमध्ये 96.77% यशाचा डंका”

बांदा : दिव्यज्योती प्रशालेने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत 96.77% निकालाची नोंद केली आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले आहे. यामध्ये स्वरा सातार्डेकर हिने 94.20% गुण मिळवून प्रशाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला. समृद्धी परब हिने 93.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर ख़ुशी शेख 92.40% गुण मिळवत तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. यावर्षी प्रशाळेतून दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 31 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी 19 विद्यार्थी विशेष प्रविण्य श्रेणित, 8 विद्यार्थी प्रथम श्रेणित तर 3 विद्यार्थी द्वितीय श्रेणित उत्तीर्ण झालेत. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रॉबिन, व्यवस्थापक फादर लिजो, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.