सावंतवाडी : कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल यावर्षी शंभर टक्के लागला असून प्रथम क्रमांक कु. मृणाली मधुकर देसाई ९७.२०%, द्वितीय क्रमांक कु. तेजस चंद्रोजी सावंत ९७.२०%, तृतीय क्रमांक कु. आर्या भार्गव फाले ९६. ४०% गुण मिळवले या वर्षी प्रशालेतून ८९ विद्याथ्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या सर्व विद्यार्थ्यांचे सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी या संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पै, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर तसेच ही संस्था संचलित कळसूलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सूर्यकांत भुरे तसेच सर्व संस्थापदाधिकारी व प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले












