मंत्री मत्स्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्तिथीत पनवेल मत्स्य उपकेंद्रात ‘स्कायला अॅक्वेरियम प्रकल्पबाबत मंत्रालयात बैठक पार पडली. पनवेल येथे प्रस्तावित ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा उभारण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश यावेळी दिले. या बैठकीस आमदार विक्रांत पाटील, मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्यउद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.












