सरपंचपदी निवडीनंतर साहिल पांचाळ यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट, पुढील वाटचालीस शुभेच्छा

देवगड तालुक्यातील चाफेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी साहिल पांचाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच साहिल पांचाळ यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सरपंच साहिल पांचाळ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मिलिंद साटम, राजू शेटये, अमित साटम, चंद्रकांत साटम आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.