वेंगुर्लेकरांसाठी नवीन आकर्षण – ‘नमो उद्यान’चे मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

वेंगुर्ले शहरातील खांबडभटवाडी येथे पहिले “नमो उद्यान” विकसित होत आहे. या उद्यानाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. निवडणूक प्रचाराच्या वेळी या भागाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाला नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, बांधकाम सभापती प्रणव वायंगणकर, महिला बालकल्याण सभापती गौरी मराठे, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, नगरसेवक दाजी परब व अन्य सर्व नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.