शिल्पकार श्री. दत्तात्रय मठकर यांना प्रतिष्ठेचा ‘भारतरत्न गौरव’ पुरस्कार जाहीर

दत्तात्रय मठकर यांना पुरस्कार जाहीर
वेंगुर्ला : मुंबई मराठी युवा पत्रकार संघ आदर्श मुंबई फाउंडेशन आणि ओंकार अकॅडमी ऑफ आर्टस यांच्यावतीने आयोजित
‘संविधान सन्मान परिषद २०२६’ चा भारतरत्न गौरव पुरस्कार वेंगुर्ला-हरिचरणगिरी येथील शिल्पकार दत्तात्रया मठकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा विकास कॉलेजा सभागृह विक्रोळी मुंबई येथे शनिवार, १८ एप्रिल रोजी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.