आ.निलेश राणे कार्यकर्त्यां बद्दल बोलताना झाले भावूक ….

कुडाळ

कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे कुडाळ मधील एका कार्यक्रमा दरम्यान कार्यकर्त्यां बद्दल बोलताना भावूक झालेले पाहायला मिळाले. राणे कुटुंबासोबत काम केलेले हे कार्यकर्ते कोणे एके काळी कट्टर विरोधक बनले होते. मात्र त्यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे पुन्हा एकत्र आल्याचे पाहून निलेश राणे यांनी समाधान व्यक्त केले.मला लहानपणापासून बघितलेली ही सगळी मंडळी आहेत. माझ्याकडे शब्द नाहीत तुमचे आभार मानायला. मी लहानाचा मोठा तुमच्यासमोर झालेलो आहे. माझ्या मनात एकच विचार असायचा, जेव्हा आपण वेगवेगळ्या पक्षांमध्ये होतो, माझ्या मनामध्ये मी एक दिवस ठरवले होते, की कधीतरी एक दिवस असा येईल, जेव्हा परत हे सगळे जण व्यासपीठावर एकत्र येतील, अशा भावना निलेश राणे यांनी व्यक्त केल्या.ज्यांच्यासमोर मी लहानाचा मोठा झालो, त्यांनी मला राजकीय संस्कार दिलेत. राणे साहेब यांचे मार्गदर्शन तर आहेच. त्यांनी मला शिकवले ते माझे गुरू आहेतच. संजय पडते, काका कुडाळकर, दत्ता सामंत यांनी मला मोठे केले, त्यांना मी कधीतरी एकत्र आणणार. राणे साहेबांच्या लोकांना मी वेगळ्या आशेने बघायचो, यांना कोणताही त्रास, अडचण होता नये. हे आहेत त्यामुळे आम्ही आहोत. ही भावना मनात घेऊन राजकारणात उतरलो. निलेश राणेंच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जेवढे काय करायचे, ते मी करणार असे निलेश राणे म्हणाले.