मुलींचे स्वागत म्हणून राबवला अनोखा उपक्रम…

कुडाळ

सन २०२४- २५ या वर्षात झाराप येथे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींचे स्वागत म्हणून ग्रामपंचायतीने नुकतेच वृक्ष व खेळणी वाटप केले. ग्रामपंचायतीच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे लेकीच्या नावाने झाराप गावात झाड लागणार आहे. झाराप ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या लेकीचे तिच्या नावाने लावल्या जाणाऱ्या झाडाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला आहे. मुलीचे स्वागत म्हणून ग्रामपंचायतीतर्फे त्यांना मुलीच्या जन्माबरोबरच वृक्ष लागवड केल्याने मुलगी जशी मोठी होईल तसे वृक्षही मोठे होत जातील. झाडे फळांनी लगडलेली असतील. त्याच त्यात पर्यायी उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होणार आहे.विकसित वृक्षापासून मिळणा-या उत्पन्नातून तिच्या शिक्षणासाठी आवश्यक आणि लग्नाच्या वेळीही असणाऱ्या पैशाची निकट भागवता येऊ शकेल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबवला आहे. , मुलींना चांगले संस्कार आरोग्य व शिक्षण देऊन सक्षम व्हावेत. यातून देशाचे गावाचे भवितव्य उज्वल होणार आहे. या कार्यक्रमाला झाराप सरपंच दक्षता मेस्त्री, ग्रा. पं. सदस्य तनया मांजरेकर, अमृता हरमलकर, ग्रामविकास अधिकारी फुंदे अंगणवाडी सेविका मांजरेकर, कडेकर, कुडाळकर, गोडे, तसेच एमएसईबी कार्यालयाच्या तंत्रज्ञ निकिता सकपाळ दक्षता मेस्त्री,सरपंच झाराप विभाग सी. एच. ओ. अंकिता गावकर, व राठोड आदी उपस्थित होते.