आमदार किरण भैया सामंत यांचा बेनिखुर्द लांजा येथे डबल धमाका…

बेनी खुर्द शाळा रस्ता व बौद्धवाडी रस्ता आदी दोन कामांचा एकाच दिवशी शुभारंभ

आमदार किरण भैया सामंत यांच्या माध्यमातून लांजा तालुक्यात विकासाचा झंजावात सुरू असून, गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेले बेनिखुर्द येथील जि. प. शाळेकडे जाणारा रस्ता व बौद्धवाडी प्रदीप धनावडे घराकडे जाणारा रस्ता आधी दोन कामांचा शुभारंभ एकाच वेळी करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपतालुकाप्रमुख सुजित आंबेकर, तालुका संघटक प्रसाद माने, विभाग प्रमुख महेश गुरव- दिनेश पवार, युवती तालुकाधिकारी अनुष्का कातकर, उपतालुका संघटिका मोनिका चव्हाण, सरपंच रूपाली लोटणकर, उपसरपंच विजय बंडबे, ग्रा. प. सदस्य रोहिणी धनावडे, लतिका बंडबे, शाखाप्रमुख विजय चव्हाण, उपशाखाप्रमुख संतोष बंडबे, युवासेना शाखाधिकारी प्रकाश चव्हाण, बुथप्रमुख महेश धनावडे आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणारे रस्ते आमदार किरण भैया सामंत यांच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आमदार किरण भैया सामंत यांच्या माध्यमातून लांजा तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असल्याने लांजा तालुक्यातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.