श्री. स.ह. केळकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मनविसे जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे आणि जिल्हाध्यक्ष श्री. अनिकेत तर्फे यांच्या शुभहस्ते विद्यार्थी मित्रांचा प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री. स.ह. केळकर महाविद्यालय अंतर्गत राज्यस्तरीय लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत महाअंतिम फेरीत द्वितीय क्रमांक पटकविल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज देवगड जामसंडे येथे या विद्यार्थी मित्रांचा मनविसे जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे आणि जिल्हाध्यक्ष श्री. अनिकेत तर्फे यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्रक आणि सामूहिक सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. प्रसंगी मनसे देवगड तालुका अध्यक्ष श्री. संतोष मयेकर, प्रसिद्धी माध्यमप्रमुख श्री. महेश नलावडे, मनविसे उपजिल्हा अध्यक्ष श्री. राकेश मिराशी, देवगड तालुका संपर्क अध्यक्ष श्री. दिनेश झोरे, देवगड तालुका अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जाधव, मनसे देवगड शहर अध्यक्ष श्री. सचिन राणे, मनविसे शहर अध्यक्ष श्री. अभिजीत तेली, उपतालुका अध्यक्ष कु. दिपक जानकर उपस्थित होते.










