कोकणशाही

कोकणशाही

मासेमारी बंदी काळात आर्थिक मदतीची तयारी; पालकमंत्री नितेश राणेंनी मत्स्य विभागाच्या बैठकीत दिले महत्त्वाचे निर्णय

मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत विविध महत्त्वाच्या विषयांवरील कार्यवाहीबाबत मंत्रालयात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी बैठक घेऊन आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने क्रियाशील मच्छीमार सभासदांना मासेमारी बंदी कालावधीत उदरनिर्वाहासाठी इतर राज्यांच्या धर्तीवर आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, राज्याच्या जलधी क्षेत्रातील…

कोकण किनारपट्टीवर सुरक्षा कवच; मंत्री नितेश राणेंच्या कडक सूचना

सागरी किनारपट्टी सुरक्षेच्या अनुषंगाने आज मंत्रालयातील दालनात बैठक घेऊन मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी सविस्तर आढावा घेतला. सागरी किनारपट्टीवरील संभाव्य धोके रोखण्यासाठी सागरी सुरक्षा अधिक सक्षम व सतर्क असणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबई किनारपट्टीप्रमाणेच रत्नागिरी व…

मोती तलावाच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणेंची पुढाकार बैठक

सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक मोती तलावाच्या पुनरुज्जीवन व आधुनिक सुविधांसह त्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयातील दालनात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत सविस्तर सादरीकरण पार पडले. मोती तलावाचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवत पर्यटन, सौंदर्यीकरणासह आकर्षणाचे…

“आ. प्रमोद जठारांच्या पाठपुराव्याला यश? ग्रामविकास कामांना मिळणार चालना”

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामविकासाच्या विविध कामांबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. यावेळी विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करून विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली. यावेळी मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत…

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवगडमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त

देवगड : देवगडमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवगड पोलिसांकडून संचलन करण्यात आले. यावेळी जामसंडे ते देवगड स्टॅन्ड मार्गावर बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर देवगड पोलिसांकडून जामसंडे ते देवगड स्टॅन्ड ठिकाणी संचालन करण्यात आले. या संचालनामध्ये पोलीस निरीक्षक शाम बुवा, पोलीस उपनिरीक्षक संतोष…

कोकण पर्यटनाला ब्रेक; मान्सूनपूर्व समुद्र धोकादायक

तिकडे दक्षिणेकडे मान्सून केरळच्या किनाऱ्यावर आदळत असताना इकडे अरबी समुद्राचे अंतरंग खवळले आहे. रिप करंट असो की अंडर करंट असो यांचा प्रभाव वाढला आहे. गेल्या चार दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वच किनाऱ्यांवर पर्यटकांची तुडुंब गर्दी उसळली होती. यात चार पर्यटक बुडाल्याच्या…

भारतात इबोलाची एंट्री? बंगळुरूत संशयित तरुणी क्वारंटाईन

नव्या विषाणूने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. काँगो आणि युगांडामध्ये इबोला विषाणूचा उद्रेक झाला असून परिस्थिती गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. इबोला हा संसर्गजन्य रोग असून तो रक्त, उलटीद्वारे पसरतो. या व्हायरसवर अद्याप औषध किंवा लस उपलब्ध झाली नसल्याची माहिती…

बांधकाम सभापतींची कार फोडली; पोलिस चौकशीची मागणी

वैभववाडी : वैभववाडीचे बांधकाम सभापती रणजीत तावडे यांची कार अज्ञाताने फोडल्याने वैभववाडीमध्ये खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी तावडे यांनी केली आहे. वाभवे-वैभववाडी नगर पंचायतीचे बांधकाम सभापती तावडे यांच्या व्हॅगनार कारची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड…

मच्छीमारांसाठी आनंदाची बातमी! आधुनिक फिश मार्केट आणि ई-रिक्षा योजना सुरू – मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत “फिश वेंडींग ई-रिक्षा” मॉडेल राबविण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर करावा, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश…

रत्नागिरीत पाण्याचा हाहाकार; ४३ हजार नागरिक टंचाईच्या विळख्यात

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. नद्या, विहिरी, तलाव आणि लहान धरणांतील पाणीसाठे झपाट्याने कमी होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २५ मे…