अवनी नेनेची रशियात भरारी! वाडा हायस्कूलमध्ये शुभेच्छा समारंभ संपन्न । Kokanshahi ।

देवगड : वाडा येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कूल या प्रशालेची माजी विद्यार्थिनी कु.अवनी विनायक नेने हिची पशुवैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी रशिया येथील सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात निवड झाली असून बुधवार दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रशाला, स्थानीय समिती व शालेय समितीच्या माध्यमातून शुभेच्छा समारंभ सकाळी १०.०० वाजता तात्या भिडे सभागृहात संपन्न झाला. या वेळी स्थानीय समिती अध्यक्ष श्री.शांताराम पुजारे, शाळा समिती अध्यक्ष श्री.हर्षद जोशी, स्थानीय समिती सदस्य श्री.विश्वजित सातवळेवकर, मुख्याध्यापिका सौ.स्मिता तेली, कु. अवनी नेने, पालक सौ. स्वानंदी नेने हे मान्यवर उपस्थित होते.
कु.अवनी नेने हिने १०वी पर्यंतचे शिक्षण वाडा हायस्कूल येथून पूर्ण करत, १२वी पर्यंतचे शिक्षण रत्नागिरी येथे पूर्ण केले. त्यानंतर रशिया येथील विद्यापीठाची प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करत तिची निवड उच्चशिक्षणासाठी झाली आहे. या निवडीबद्दल तिचे व पालकांचे विशेष अभिनंदन शाळा व संस्था यांच्यामार्फत करण्यात आले. यावेळी कु.अवनी नेने, सौ. स्वानंदी नेने, श्री.हर्षद जोशी, श्री. विश्वजित सातवळेकर, श्री.शांताराम पुजारे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भूषण दातार, प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.स्मिता तेली तर आभार श्री.सचिन मोरे यांनी व्यक्त केले.