देवगडात मंत्री नितेश राणेंच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ एसटी गाड्यांचे लोकार्पण

देवगड : देवगड एसटी बसस्थानकाच्या ताफ्यात मालिकेच्या पाच नव्या एसटी गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्यांचे लोकार्पण राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी माजी आमदार अॅड. अजित गोगटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, पडेल मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, देवगड शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, पं. स. सभापती गणेश राणे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम, भाजप तालुका सरचिटणीस योगेश चांदोस्कर, न. पं. गटनेते शरद ठुकरूल, न. पं. पाणी पुरवठा सभापती तन्वी चांदोसकर, अॅड. प्रणाली माने, भाजयुमो शहराध्यक्ष दयानंद पाटील, संतोष किंजवडेकर, उमेश कणेरकर, सुभाष धुरी, मिलिंद माने, प्रियांका साळसकर, एसटी विभाग नियंत्रक दिलीप घोडे, यंत्र अभियंता श्री. वाघमोडे, स्थानकप्रमुख सौरभ ओंडकर यांच्यासह जि. प. व पं. स. सदस्य, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नीतेश राणे यांनी नव्याने दाखल झालेल्या बसची प्रत्यक्ष पाहणी केली. बसमध्ये जात त्यांनी आसन व्यवस्था, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा तसेच बसची एकूण रचना याबाबत सविस्तर माहिती घेतली. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाहतूक व्यवस्थेला आणखी बळकटी देण्यासाठी लवकरच २० मिनी बस जिल्ह्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे दुर्गम व ग्रामीण भागातील ग्रामस्थांचा प्रवास अधिक सुलभव सुखकर होणार आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक चांगली व सुरक्षित सेवा मिळावी, यासाठी राज्य परिवहन विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.