“काम असेल तर हाक द्या; मी तुमच्यासोबत आहे – जि. प. सदस्य रुपेश पावसकर

दोडामार्ग तालुका भंडारी समाजाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी समाज बांधवांना संबोधित करताना नेरुळ जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी दहावी बारावीतील उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यात आपण चांगल्या पदावर जावे असे मत व्यक्त करत भंडारी समाज बांधवांसाठी जिल्हा परिषद मार्फत कुठलेही मदत भासल्यास आपण नेहमीच तुमच्या सोबत असेल आपल्याला कधीही हाक द्या मी तुमच्यासाठी कार्यतत्पर असणार तसेच आपल्या समाजाचा नाव पुढे आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे प्रत्येक क्षेत्रात आपले समाज बांधव पुढे येणे गरजेचे आहे त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ आपल्या पाठीशी असेल असे सांगत दोडामार्ग तालुका समाजाचे उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक केले .यावेळी दोडामार्ग तालुका भंडारी समाजाच्या वतीने रुपेश पावसकर यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर, कार्याध्यक्ष शेखर(राजू)गवंडे, माजी अध्यक्ष रमण वायंगणकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समीर जळवी,उपाध्यक्ष विठोबा पालयेकर, दोडामार्ग तालुका अध्यक्ष मोहन गवंडे, महिला प्रतिनिधी कवठणकर मॅडम आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.