बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवगडमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त

देवगड : देवगडमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवगड पोलिसांकडून संचलन करण्यात आले. यावेळी जामसंडे ते देवगड स्टॅन्ड मार्गावर बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर देवगड पोलिसांकडून जामसंडे ते देवगड स्टॅन्ड ठिकाणी संचालन करण्यात आले. या संचालनामध्ये पोलीस निरीक्षक शाम बुवा, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव यांच्यासह 20 पोलीस कर्मचारी आणि 10 होमगार्ड सहभागी झाले होते. देवगड येथील विविध मार्गावरील विविध ठिकाणी पाहणी करत नागरिकांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
यावेळी सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा. यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून या पोलिस संचालनाचे आयोजन करण्यात आले होते.