भारतात इबोलाची एंट्री? बंगळुरूत संशयित तरुणी क्वारंटाईन

नव्या विषाणूने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. काँगो आणि युगांडामध्ये इबोला विषाणूचा उद्रेक झाला असून परिस्थिती गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. इबोला हा संसर्गजन्य रोग असून तो रक्त, उलटीद्वारे पसरतो. या व्हायरसवर अद्याप औषध किंवा लस उपलब्ध झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली असल्याची माहिती मिळत आहे. हा व्हायरस इतर भागात देखील पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जगभरात आता पुन्हा एकदा नवा विषाणू पसरला असून हंतानंतर आता इबोलाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. या नव्या व्हायरसने सर्वांची चिंता वाढवली आहे. काँगोमध्ये इबोला विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता इबोला व्हायरसचा धोका वाढताना पाहायला मिळत आहे.

यातच आता भारतात इबोलाचा संशयित रुग्ण आल्याची माहिती मिळत आहे. युगांडाहून परतलेल्या तरुणीला क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ही तरूणी बंगळुरूतील विमानतळावर उतरली होती. तरुणीला रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.