“गोवंश संरक्षणासाठी सिंधुदुर्गात कडक पावले; पालकमंत्री नितेश राणेंची उच्चस्तरीय बैठक”

महाराष्ट्र शासनाने गोवंशाची अवैध वाहतूक, गोहत्या तसेच बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थाbअबाधित राखण्याबाबत मंत्रालयातील दालनात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी बैठक पार पडली.
बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर, अपर पोलीस अधीक्षक नयेामी साटम यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.