कणकवली शहरात होणारे भूमिगत वाहिनीचे काम करायचे असल्याने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतुकीत फेरबदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कणकवली येथील पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर या मार्गावर ११ के. व्ही. ची उपरी उच्चदाब वाहिनी भूमिगत करण्याचे काम महावितरणतर्फे हाती घेण्यात आले आहे. यासाठी रस्त्याच्या एका बाजूची खोदाई होणार असल्याने रस्ता अरुंद होणार आहे. हे काम दिनांक २१ मे पासून या कालावधीत रात्री १० वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. या वेळेत वाहनधारकांनी पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर या मागएिवजी गांगो मंदिर ते लक्ष्मी चित्रमंदिर या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.












