दहावीच्या निकालात पुन्हा कोकणचा डंका; 97.62% निकालासह राज्यात अव्वल

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीचा निकाल आज लागला आहे. यंदा 92.09 टक्के निकाल लागला. कोकण विभाग यंदाही अव्वल असून 97.62 टक्के एवढा निकाल लागला आहे. कोकण विभागाचा निकाल ९७.६२ टक्के लागला असून
कोकण पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आहे.
10 वीचा निकाल जाहीर झाला असून 92.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. इयत्ता 10 वीचा निकाल बोर्डाकडून जाहीर करण्यात आला असून १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी पास झालेत. ९२.०९ टक्के उत्तीर्ण झालेत. एकूण २८ हजार २५ विद्यार्थी फॉर्म नंबर १७ भरून बसले त्यापैकी २२ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिपीटर पैकी ९ हजार ७५७ विद्यार्थी पास झाले. ३३. ८९ टक्केवारी उत्तीर्ण एवढी आहे.