सावंतवाडी : गुरु नंदी स्मृतिप्रित्यर्थ सद्गुरू दळवी मित्रमंडळ व नीलेश दळवी आयोजित शनिवार, ९ मे रोजी होडावडा येथे दुपारी २.३० ते ६ या वेळेत सुदृढ बैल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मोठा गट प्रथम क्रमांक ११११, द्वितीय ७७७, तृतीय ५५५, उत्तेजनार्थ पाच किलो खाद्य आणि सन्मानचिन्ह अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे चेअरमन मनिष दळवी, उपसरपंच राजवा सावंत, स्वप्नाली सावंत, आदिती नाईक, अक्षता नाईक, मनोज होडावडेकर, एकनाथ तळवणकर, संतोष कोटतरकर, लक्ष्मण आगलावे, संदीप मांजरेकर, सरपंच रसिका केळुसकर आदी उपस्थित राहणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन सद्गुरू दळवी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी-९४२०११२४०८ येथे संपर्क साधावा.












