कुडाळ शहरातील सांगिरडेवाडी येथील कचरा डेपोला पुन्हा आग लागण्याची घटना आज संध्याकाळी घडली. याबाबतची माहिती प्रशासनास मिळताच कुडाळ नगरपंचायत आणि एमआयडीसी यांच्या अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

मुख्य म्हणजे कुडाळ शहरातील कचरा गोळा करताना वेगवेगळा घेतला जातो. परंतु, या कचरा डेपोच्या ठिकाणी ओला आणि सुका कचरा एकत्र टाकला जातो. याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडून योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. प्रशासनाने यावर वारंवार नागरिकांनी सूचना देऊन पण “जैसे थे” परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी आमदार निलेश राणे यांनी सुद्धा कचरा डेपोला प्रत्यक्ष भेट देऊन आग लागण्याच्या घटनेची चौकशी व्हावी आणि योग्य ती कारवाई करावी अशा सूचना प्रशासनास केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही आज पुन्हा एकदा कचरा डेपोला आग लागण्याची घटना घडली.
सदर कचरा डेपोस्थळी कायमस्वरूपी एक व्यक्ती पाहणीसाठी असणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.












