मालवण तालुक्यातील मालोंड माळ येथे पारंपरिक आणि थरारक अशा राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत- २०२६ या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. राकेश परब मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळाला.
या शर्यतीला विशेष आकर्षण लाभले ते म्हणजे आमदार निलेश राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांची उपस्थिती. त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावून स्पर्धकांना आणि आयोजकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी पालकमंत्री नितेशजी राणे यांच्यासह इतर मान्यवर, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
या स्पर्धेमुळे ग्रामीण संस्कृतीला चालना मिळत असून, अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये पारंपरिक खेळांविषयीची आवड वाढत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.












